सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी अंबादास अण्णा ओरसे यांची निवड.....

आण्णांनी तन-मन-धनाने सामाजिक कार्य केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निष्ठेने राहून पक्ष संघटन व तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कामाचे पोचपावती म्हणून निवड 
अकलूज प्रतिनिधी
अकलूजचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अंबादास (आण्णा) ओरसे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी अंबादास अण्णा यांचे राजकीय सामाजिक काम पाहून तसेच आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरणे व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आतापर्यंत श्री ओरसे यांनी तन-मन-धनाने केले म्हणून त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेऊन अंबादास अण्णा ओरसे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड
 केल्याने सोलापूर सोलापूर जिल्हा सहित पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला निवड करतेवेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग चे  उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड, राज्य सचिव तुकाराम साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राहुल ढेरे हे उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form