महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा दर्पण दिन उत्साहात साजरा

पत्रकाराने स्वाभिमानाने पत्रकारिता करावी:- ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे
पंढरपूर --प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पंढरपूर  शाखेच्या वतीने  शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार भवन येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर होते तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, संपादक बाळासाहेब बडवे यांनी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन करत म्हणाले की ,सर्वसामान्य माणसाच्या भावना, वेदना, अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पत्रकार बांधवांनी घ्यावी तसेच पत्रकार मुल्य जपावे तसेच कार्य कर्तृत्वाची जाणीव करून देत त्यांनी सध्याच्या पत्रकार  बद्दल भाष्य केले पत्रकारिता निपक्षपणे करणे पत्रकारांचे कर्तव्य आहे स्वतंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये पत्रकारिता ही चळवळ , समाजप्रबोधन, राष्ट्रभक्ती होती सध्याची पत्रकारिता  व्यवसायिक पत्रकारिता असून यामध्ये मानवधर्माचे पालन होणे गरजेचे आहे. पत्रकाराने स्वाभिमान जागृत ठेवून पत्रकारिता करावी व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे ते म्हणाले.

      याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुनील वाळूजकर उपमुख्य अधिकारी नगरपालिका पंढरपूर ,अविनाश गरगडे उप माहिती अधिकारी ,आदर्श शिक्षिका अशा शिरसागर, राजेंद्र कोरके पाटील महाराष्ट्र राज्य पश्चिम विभाग उपाध्यक्ष तसेच नूतन शहर अध्यक्ष नागेश आदापुरे तालुका अध्यक्ष मनोज पवार,सचिन कुलकर्णी यांनी बदलत असलेल्या पत्रकारिता या बाबतीत आपले विचार मांडले तसेच आदी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले . 
यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत राजेंद्र कोरके पाटील यांनी केले तर प्रास्ताविक नागेश आदापुरे यांनी केले आभार प्रदर्शन रामदास नागटिळक यांनी केले सुत्रसंचलन सचिन कुलकर्णी यांनी केले.
 याप्रसंगी कुमार कोरे, विनोद पोतदार,प्रवीण नागणे, संजय यादव, राजेश बदले पाटील, लक्ष्मण शिंदे, नितीन खाडे ,सुनील कोरके, प्रदीप आसबे, अशफाक तांबोळी आदी मान्यवर मंडळी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form