कुकडी,दहिगाव,रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार
करमाळा --(प्रतिनिधी)
हे सर्व सामान्यांचे सरकार आहे रस्ते वीज पाणीसह आदी विकास कामे होत आहे शेतकरी वर्गाची वीज खंडित होणार नाही परंतु चालू वीज भरा असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.
यावेळी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नारायण पाटील, आमदार राम शिंदे, संचालिका रश्मीदीदी बागल,शिवाजी सावंत, चेअरमन धनंजय डोंगरे, व्हा चेअरमन रमेश कांबळे, संचालक डॉ हरिदास केवारे, देवानंद बागल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे,भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल,कारखाना कार्यकारी संचालक बागनवर,डांगे साहेब आदिजण उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल या दोघांनी करमाळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी कुकडी, दहिगाव रिटेवाडी योजना, ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. यामुळे तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येईल.
मागणीचा उल्लेख करून रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गेली अडीच वर्षात महाराष्ट्रात एकाही उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आलेली नाही. परंतु करमाळा तालुक्यात रिटेवाडी उपसा सिंचन सारखी योजना राबवला तर तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे यासाठी तात्काळ जलसंपदा विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी तानाजी सावंत, राधाकृष्ण विखे पाटिल,रमेश कांबळे, देवानंद बागल,आदींचे भाषणे झाली होती. यावेळी शेतकरी, शिवसेना, भाजप,कारखाना कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेखर जोगळेकर,ऐश्वर्या होबारे यांनी, प्रास्ताविक रश्मी बागल यांनी तर आभार चेअरमन धनंजय डोंगरे यांनी मानले होते.