आ. समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते पैलवान स्वप्नील येडगे यांचा सत्कार

जम्मू काश्मीर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सांम्बो कुस्ती स्पर्धेमध्ये  "कास्यपदक" मिळवल्या बद्दल यांचा तुळशीहार घालून सन्मान केला.
पंढरपूर --प्रतिनिधी
पंढरपूर मतदार संघातील कोर्टी व पळशी गावचे सुपुत्र पैलवान स्वप्नील येडगे व गणेश बोडरे यांनी जम्मू काश्मीर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सांम्बो कुस्ती स्पर्धेमध्ये  "कास्यपदक" मिळवल्या बद्दल गावांचे नाव व पंढरपुरचे नाव भारताच्या शिखरावर (जम्मू व काश्मीर) कोरले व परत एकदा पंढरपुरत कसलेले सामान्य कुटुंबातील पैलवान  असल्याचे दाखवुन दिले.
त्याबद्दल कोर्टी ग्रामस्थांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते *पैलवान स्वप्नील येडगे* यांचा तुळशीहार घालून सन्मान केला.
यावेळी आमदार महोदय यांनी बोलताना सांगितले की देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांनी जम्मू काश्मीर मधील 370 कलम हटवल्यामुळे त्याठिकाणी खुल्या स्पर्धा होऊ लागल्या आणि त्याचा फायदा आपल्या पंढरपूरतील पै. स्वप्नील आणि पै. गणेश यांना होऊन त्यानी विजयाचा बहुमान मिळवून आपल्या पंढरपूर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्या बद्दल स्वाभिमान त्या ठिकाणी निर्माण केला. याचा मला सार्थ अभिमान असले बाबत  सांगीतले.
 याप्रसंगी महाराष्ट्र केसरी स्पर्धे साठी 70 किलो वजन गटात पै.सुनील हिपरकर,पै.पांडू केदार,यांचा निवड प्रंसगी  त्यांचा ही सन्मान याठिकाणी करण्यात आला
 
या कार्यक्रमाचे आयोजन कोर्टी गावचे उपसरपंच महेश येडगे यांनी केले होते.
यावेळी श्री दत्तात्रय कोळेकर, आयुब शेख, श्री.द्रोणाचार्य हाके, मुन्ना शेख, श्री. बाळासाहेब होनकाडे, श्री. मधुकर माळी, श्री. समाधान शेंडगे, गादेगावचे सरपंच श्री. मोहन (आप्पा) बागल, श्री. शांतिनाथ बागल, श्री. सतीश मस्के, श्री. संतोष डोंगरे, श्री. दादा डोंगरे, श्री. नागेश काळे, श्री.भास्कर घायाळ, श्री.लक्ष्मण जाधव, श्री. भैय्यासाहेब कळसे, श्री.पद्माकर बागल, मस्जिद पटेल, अझरुद्दीन शेख,आणीस पाटील, प्रा.प्रवीण वाघमोडे, अलीम मुलाणी,अमीर शेख,नाना हाके,धर्मा येडगे, आदी मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form