गुणवंत विद्यार्थी मोहम्मद अली असगर निजाम शेख याचा यथोचित सन्मान समाजसेवक कमलीवाले यांच्या कुटुंबाकडून
पंढरपूर येथील मदरशातील विद्यार्थ्यांने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या स्पर्धेत कव्वाली गायली. या कव्वालीने देशात द्वितीय क्रमांक मिळवला, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. मोहम्मद अली असगर निजाम शेख या विद्यार्थ्यांची मोठी वाहवा झाली . या विद्यार्थ्यांचा सत्कार समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले यांनी मदरशात जाऊन केला. यावेळी हजरत सय्यद अहमद अरिफ साहेब किल्ला आणि हजरत सय्यद मोहम्मद रजा मारूप सहाब किल्ला हेही उपस्थित होते.
पंढरपूरमध्ये कार्यरत असलेल्या दारुल उलूम सुफीया या मदरशातील विद्यार्थ्यांने पंढरपूरचे नाव देश पातळीवर नेऊन पोहोचवले आहे. पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या नॅशनल सहितोत्सव स्पर्धेत त्याने कमाल केली. या स्पर्धेत त्याने गायलेल्या कव्वालीस देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळाला , तर राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. अशा या गुणवंत विद्यार्थी मोहम्मद अली असगर निजाम शेख याचा यथोचित सन्मान समाजसेवक कमलीवाले यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला.
पंढरपूर मधील दारुल उलूम सुफीया या मदरशामध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकत आहेत. अनेक विद्यार्थी कुटुंबापासून दूर राहून शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी हाफीसाब होतात. या ठिकाणी नमाज आणि कुराणही शिकवले जाते. अशा या मदरशातील विद्यार्थ्यांनी मदरशाचे आणि पंढरपूरचे नाव देशपातळीवर पोहोचवले आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान मुजमील कमलीवाले यांच्याकडून करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील हा खलील कमलीवाले,हा शकील कमलीवाले, वसीम तांबोळी आणि दानिश कमलीवाले उपस्थित होते.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे मोफत आरोग्य शिबीर ठेवले होते तसेच आता थंडीपासून संरक्षण होण्यासाठी मुलांना शाल दिले आणी मुलांना वह्या पुस्तक दिले होते.