"कॉरिडॉर हा झालाच पाहिजे"
कॉरिडोर झालाच पाहिजे,अशी घोषणा या पंढरपूर बंदच्या वतीने निघालेल्या मोर्चामध्ये मोठ्याने बोलले गेले. तेव्हा मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने हे त्वरित बंद करण्यास सुरुवात केली.
पंढरपूर(विनोद पोतदार)
आम्ही भारतीय लोक या सर्वपक्षीय समितीच्या वतीने आज पंढरपूर बंद चे आयोजन करण्यात आले होते ,पंढरपूर बंद मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून आला, संपूर्ण शहरातील व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद केले आणि या पंढरपूर बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यात आला.
महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी अवमान कारक शब्द खुद्द राज्यपाल तसेच उच्च पदस्त राजकीय नेते मंडळीने काढले असताना त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोर्चे निघत आहेत, बंद पाळला जात आहे. अशाच प्रकारचा पंढरपूर बंदचे आव्हान सर्व पक्षीय नेते मंडळींनी व विविध सामाजिक संघटना आणि सर्व सामान्य जनतेनी ,आज पंढरपूर बंदचे नियोजन करण्यात आले होते.संपूर्ण शहरां मधील व्यापारी दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केलेली असताना फक्त मंदिर परिसर महाद्वार या भागातील दुकाने ही चालू होती. असे समजताच या मोर्चातील नेत्यांनी "कॉरिडॉर झालाच पाहिजे" अशी घोषणा करताच मंदिर परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली.
महाराष्ट्रातील महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विषयी अवमानकारक शब्द वापरल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेचा अवमान झाला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी देखील या महापुरुषांच्या वर अवमानकारक असे शब्द बोलले आहेत या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनता या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे महापुरुषांचा अवमान झाल्यामुळे पंढरपूर शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना आणि आज सोमवार रोजी पंढरपूर बंदचे आव्हान करण्यात आले होते या पंढरपूर बंद आव्हानाला पंढरपूर शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश फाटे, किरणराज घाडगे, सुधीर भोसले, उमेश सासवडकर, संदीप मांडवे, काँग्रेसचे अमरजित पाटील, समीर कोळी, राजेश भादुले, वंचित बहुजन आघाडीचे सुनिल वाघमारे, सागर गायकवाड, रिपाईचे अॅड. किर्तीपाल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, अमित कसबे, विशाल मांदळे, आम आदमी पार्टीचे महादेव पाटील, दिलीप देवकुळे, तसेच कृष्णा वाघमारे, संतोष सर्वगोड, अखिलेश वेळापूर, अमर शेवडे, महेंद्र जाधव, अंबादास वायदंडे आदीसह विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी झाले होते.
याबाबतचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे व मंडल अधिकारी शिवशरण यांना देण्यात आले