श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जुनी नॅशनल हेवी मिलचे मोळी पुजन

११ कामगारांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न
पंढरपूर १२ : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या जुनी नॅशनल हेवी मिलचे मोळी पुजन सोमवार दि.१२.१२.२०२२ रोजी कारखान्याचे कामगार सर्वश्री औदुंबर जगताप, मारूती पोरे, श्रीमंत डोईफोडे, बापुराव पाखरे, दिलीप पाटील, नितीन घोगरे, कैलास रणसिंग, विष्णु जाधव, जाकिर हुसेन, धनाजी यादव व बळीराम पवार या ११ कामगारांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

चालु २०२२-२३ या गळीत हंगामामध्ये कारखान्याने उल्का मिलने आज तागायत २,८३,५१५ मे. टन इतके गाळप केलेले आहे. सध्या कारखान्याची जुनी नॅशनल हेवी मिलचे अपूर्ण काम पूर्ण करून आजरोजी कारखान्याच्या कामगारांच्या शुभहस्ते चालु करण्यात आलेली आहे. त्यामुळे कारखान्याच्या गळीतामध्ये वाढ होवून कारखाना प्रतीदिन १०,००० मे. टन गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून शेतकरी सभासदांचा वेळेत ऊस गाळप करणे शक्य होणार आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड तसेच एम. एस. सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील व सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form