गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डायलेसिस सेंटर, आयसीयु सुविधा, आरोग्य केंद्रास ॲम्ब्युलन्स देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन
पंढरपूर: प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील
प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत ही जीर्ण झाली असून नवीन इमारत द्यावी व कर्मचारी हेडक्कॉर्टरर्स देखील नव्याने बांधाव्यात या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजित बागल यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले आहे. या निवेदनामध्ये गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डायलेसिस सेंटर, आयसीयु सुविधा, आरोग्य केंद्रास अॅम्ब्युलन्स देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन त्यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन देले असता. आरोग्य मंत्र्यांनी या मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही सुरू करणेसाठी आश्वासित केले.