आधीस्वीकृती पत्रकारांचा मृत्यू झाल्यास १ लाख रु.मिळणार ?
मुंबई ---
आधीस्विकृती पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत
महाराष्ट्र शासनाचे आधी स्वीकृती पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी. पत्रकार कल्याण निधी या शासकीय विश्वस्त संस्थेकडून १ आक्टोंबर 2013 रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णय तरतुदीनुसार. व शासन जोडपत्रातील. अ .क्र. ७ नुसार मदत १ लाख रुपये दिले जातात.यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी तेथील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे. अर्ज करताना. आधीस्वीकृती ओळखपत्राची दोन्ही बाजूची झेरॉक्स, जिल्हा रुग्णालयाचा मृत्यूचा दाखला, अर्जदाराचे शासनमान्य बँकेच्या खाते उतारा, पत्रकाराच्या मृत्यूची वृत्तपत्रात आलेली बातमीची झेरॉक्ससोबत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. न्यायालय अथवा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेले वारस पत्र व इतर वारसांचे संमती पत्र सोबत द्यावे लागते. अशी सर्व कागदपत्रे अर्जा सोबत असली म्हणजे समितीच्या कार्यकारणी मीटिंगमध्ये मंजुरी होऊन रुपये एक लाख अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये एन. इ. एफ. टी. द्वारे जमा होतो. अशामुळे विविध पत्रकार संघटनांना आपल्या परिसरातील आधीस्वीकृती धारक पत्रकाराचा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ही मदत लवकर देण्यास कोणतीही अडचण येत नाही.मित्रांनो याच शंकरराव चव्हाण कल्याण निधीला ८० एटीजी (इन्कम टॅक्स) सवलत क्रमांक घ्यावा म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 27 नोहे 2022 रोजी मी पत्र दिले आहे.हा क्रमांक जर मिळाला तर माझ्यासारख्या अनेक जण जेष्ठ पत्रकार त्यांच्या परदेशातील मित्रांकडून आणि परिसरातील, विविध मोठमोठ्या कारखान्या कडुन त्यांच्या सीएसआर फंडातुन या समितीच्या नावे चेक घेतल्याने पुढे अनेक ज्येष्ठ पत्रकारांना मानधन देता येईल. सध्या महाराष्ट्रात 150 जणांना व्याजातून रुपये ११००० प्रति महिना दिले जातात. महाराष्ट्रात अंदाजे ४१०० अधिक स्वीकृती धारक पत्रकार असुन त्याच्यात अनेक जण ज्येष्ठ पत्रकारही आहेत. अनेक जण या मानधनासाठी प्रतीक्षेत राहिले आहेत. या महत्त्वाच्या विषयी तातडीने कार्यवाही करावी. म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातून महासंचालक माहिती आणि जनसंपर्क विभागाकडे हे पत्र मी चौकशी केली असता पोहोचलेलेच नाही. या पत्रावर अजूनही कार्यवाही होत नाही, असो कदाचित जनसंपर्क विभागाला महत्त्वाच्या प्रश्नाकडे कामाच्या व्यापामुळे वेळ नसावा, असे वाटू लागले आहे.या कामासाठी मी मात्र१५ दिवसांनी चौकशीला मंत्रालयात जातो = ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ.