रॅपिड ऍक्शन फोर्स व सी आर पी एफची पंढरपूर शहराची पाहणी

आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी 
मंदिर परिसरातील रस्ते रुंद करण्याची गरज 
पंढरपूर :-प्रतिनिधी
 मंदिर परिसरातील रस्ते खूपच अरुंद आहेत. गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्या ठिकाणी सुरक्षा पुरवता यावी. यासाठी मंदिर परिसरातील रस्ते रुंद करण्याची गरज आहे. बदल झाले तर चांगलेच आहे. गर्दीच्या वेळी योग्य वेळेत सुरक्षा पुरवण्यास मदत होईल असे मत रॅपिड ऍक्शन फोर्स व सी आर पी एफचे सहाय्यक कमांडर स्वप्निल पवार यांनी व्यक्त केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी करण्यासाठी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडर (रॅपिड ऍक्शन फोर्स ) चे स्वप्निल पवार हे पंढरपूर येथे आले होते. या दरम्यान त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, दोन वर्षातून एकदा आम्ही सिंसेटिव्ह सिटीची पाहणी करतो असतो. आम्ही सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांची पाहणी करणार असून त्याची सुरुवात पंढरपूरपासून केली आहे.

पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, महाद्वार घाट, गल्ली बोळातील रस्ते, संतपेठ भागाची माहिती घेतली आहे. येथे सतत व्हिआयपी येत असतात. यामुळे हे शहर खूप महत्त्वाचे आहे. यामुळे येथे कोणता अनुचित प्रकार घडलाच तत्काळ मदत मिळावी या दृष्टीने आम्ही पाहणी केली आहे. त्याचबरोबर शहरातील चांगल्या गोष्टींची माहिती घेतली तसेच गुन्हेगारांची देखील माहिती घेतलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form