महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे सर्व पंढरपूरकरांच्या पाठीशी कायम राहील--- राज ठाकरे

संत भूमी बचाव समिती व पंढरपूर संघर्ष समिती यांचे पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट मांडल्या समस्या दिले निवेदन 
पंढरपूर -(प्रतिनिधी) 
पंढरपूर शहरातील अन्यायकारक कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे पंढरपूर शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी कार्यकर्ते महाराज मंडळी मंदिर परिसरातील नागरिक आणि संत भूमी बचाव समिती व संघर्ष समिती यांचे पदाधिकारी या सर्वांनी भेट घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
 यावेळी माननीय राज साहेब ठाकरे यांनी सांगितले की मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून निश्चितपणे या मधून मार्ग काढतो कोणावरही अन्याय होऊ देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे सर्व पंढरपूरकरांच्या पाठीशी कायम राहील.
यावेळी आदित्य फत्तेपूरकर, रामकृष्ण वीर महाराज ,ऍड. राजेश भादुलेबाबासाहेब बडवे ,श्रीकांत शिंदे, महंमद उस्ताद, अभय इचगावकर ,  ,कीर्तीपाल सर्वगोड ,साईनाथ बडवे, सुमित शिंदे ,महेश जी खिस्ते ,शिरीष पारसवार, बबन बिडवे ,अमृत ताठे देशमुख, व्यंकटेश कुलकर्णी ,गणेश पिंपळनेरकर ,श्रीनिवास उपळकर ,भैय्या जोशी ,गणेश लंके ,बाबा राव बडवे ,महाजन दादा भिंगे इत्यादी उपस्थितीत होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form