पंढरपूर नगरपालिकाची तत्पर सेवा
बाबांनी मानले मुख्याधिकारी यांचे आभार
पंढरपूर शहरातील अनिल नगर ,झेंडे गल्ली, भुयाचा मारुती या परिसरामध्ये स्वतः समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन फवारणी करून घेतले कारण मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेला आव्हान केले होते की माझ्या परिसरामधील डेंगू आणि मलेरियाची रुग्ण वाढत आहेत नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी नाही केल्यास तिव्र स्वरूपाची आंदोलन करू असा इशाराही दिला होता आज त्यांच्या मागणीची नगरपालिकेने तातडीने दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना करून फवारणी करून घेतली.
नगरपालिकेच्या सतर्कतेचा फायदा सर्व जनतेला दिलासा देणारी बाब ठरली आहे नगरपालिकेच्या या कार्यवाही मुळे सर्व जनतेला दिलासा मिळाला आहे तसेच संजय बाबांचे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे ते आभार व्यक्त करीत आहेत.