अध्यक्षस्थानी महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर आजी माजी खासदार, आमदार, नेते मंडळींची मांदियाळी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दि.4 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा दौऱ्यावर येणार असून आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा.लि.नंदूर येथे प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची व शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर आजी, माजी खासदार, आमदार, नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे दि.४नोव्हेंबर ठिक दु.११.५५ या शुभ मुहूर्तावर प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील शेतकरी बंधू व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवताडे शुगर अँड डिस्टिलरीजचे चेअरमन संजय आवताडे यांनी आव्हान केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजनमुळे पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत नेमके काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे.