राष्ट्रीय एकता दौड' मॅरेथॉनमध्ये स्वेरीच्या जवळपास २०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तर यातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देवून सन्मानित करण्यात आले
पंढरपूर ----- (प्रकाश इंगोले)
.राष्ट्रीय एकता दिना’चे औचित्य साधून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन (सोलापूर ग्रामीण) व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचा 'राष्ट्रीय सेवा योजना' विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय एकता दौड' मॅरेथॉनचे आयोजन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये केले होते. या ‘राष्ट्रीय एकता दौड' मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते गोपाळपुर चौक या मार्गावर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय एकता दिन चिरायू होवो’ या घोषणा विद्यार्थी देत होते. या ‘राष्ट्रीय एकता दौड' मॅरेथॉनमध्ये स्वेरीच्या जवळपास २०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तर यातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देवून सन्मानित करण्यात आले. ‘राष्ट्रीय एकता दौड' मॅरेथॉननंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची देखील सोय करण्यात आली होती
ही एकता दौड स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, विद्यार्थी अधिष्ठाता व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील, प्रा. यशपाल खेडकर, प्रा.गोडसे, प्रा.सागर सरीक, प्रा. अभिजित चव्हाण, प्रा. स्वप्नील निकम, पो.कॉ. विनायक नलवडे, डिप्लोमा विद्यार्थी ओम हरवाळकर यांच्यासह स्वेरीचे इतर प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.