कार्तिक वारीसाठी केली पंढरपूर रेल्वे प्रशासनाने उत्तम नियोजन

३६  जादा रेल्वे गाड्यांची सोय , रेल्वे पोलिस, तिकिट कर्मचारी, तिकिट तपासणीस व इतर कर्मचारी वर्ग ज्यादाचा उपलब्ध 
पंढरपूर ---(विनोद पोतदार) 
कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात.       यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने उत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे 
      
        यावेळी माहिती देताना रेल्वे पंढरपूर विभाग व्यवस्थापक जे.पी.चनगौडर म्हणाले मिरज पंढरपूर, लातूर पंढरपूर, सोलापूर पंढरपूर अशा विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे  दररोज वेळापत्रका नुसार ८०गाड्या नेहमी सुरू आहेत तर खास यात्रेसाठी ३६ गाड्यांची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर रेल्वे पोलिस, तिकिट कर्मचारी, तिकिट तपासणीस व इतर कर्मचारी वर्ग ज्यादाचा उपलब्ध करण्यात आला आहे व रेल्वे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी ८तिकिट विक्री केंद्र तयार ठेवण्यात  आली असून रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form