कर्तृत्वदक्ष आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात विविध कार्यक्रमांचे नियोजन


*शुभेच्छा*
मर्चंट बँकेचे चेअरमन मा.नागेश काका भोसले मित्र मंडळ पंढरपूर

मंगळवेढा --प्रतिनिधी
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली आहे.
     
      आज दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा व शिरनांदगी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीची वीण अधिक घट्ट केली जाणार आहे.आवताडे शुगर येथे वृक्षारोपण तसेच मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नगरपरिषद शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना २२ हजार वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
   तरी वरील सामाजिक उपक्रम कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आवताडे मित्र परिवाराचे मार्गदर्शक, आवताडे शुगर अँन्ड  डिस्टलिरीजचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form