गेल्या तीस ते पस्तीस वर्ष रखडलेल्या पंढरपूर ते कुरूल तिर्हेमार्ग रस्त्याचे कामास अखेर निधी मंजूर


संसद रत्न खा.धनंजय महाडिक व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या विशेष प्रयत्नातून पंढरपूर ते कुरूल तिर्हेमार्ग रस्त्याच्या कामास २०कोटी रूपयांचा निधी मंजूर:--- जिल्हाप्रमुख मुबीना मुलानी 

कुरूल :(प्रतिनिधी)

गेल्या तीस ते पस्तीस वर्ष रखडलेल्या पंढरपूर ते कुरूल तिर्हेमार्ग रस्त्याचे कामास अखेर निधी मंजूर झाले असून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती जिल्हाप्रमुख मुबीना मुलानी (बाळासाहेबांची शिवसेना) यांनी दिली.

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पंढरपूर, मोहोळ तालुक्याच्या गावातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको,झाले तसेच अनेकांचे या खराब रस्त्यामुळे अपाघात ही झाले‌. 

मागील सरकारच्या काळात या रस्त्याच्या कामास स्थगिती मिळाली होती परंतु या शिंदे सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्य मंत्री मा.डॉ.तानाजीराव सावंत सर,  राज्यसभा खा.धनंजय महाडिक, संपर्क प्रमुख मा.प्रा.शिवाजीराव सावंत सर यांच्या विशेष सहकार्यामुळे या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवून या रस्त्याच्या कामासाठी २०कोटी रूपये निधी मंजूर झाले असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्या मुबिना मुलाणी यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form