मनसे नेते दिलीप बापू धोत्रे मुस्लिम बांधवांना सर्वतोपरी मदत करणार

मुस्लिम समाजाचे कब्रस्तान येथिल प्रश्न लवकरच मार्गी लावणार
पंढरपूर - शहरातील भाई भाई चौक येथील बडा कब्रस्तान मध्ये शहीद टिपू सुलतान युवक संघटना व एबी ग्रुपच्या माध्यमातून शहीद टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते झाले.  यावेळी मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजाच्या थोरले कब्रस्तान येथील अडचणी दिलीप बापू धोत्रे यांच्या समोर मांडल्या. यावेळी धोत्रे यांनी तात्काळ  स्मशानभूमीची पाहणी केली.  याठिकाणी दोनच दिवसात संपूर्ण स्मशानभूमी सुशोभीकरण,  सिमेंट काँक्रीटचे रस्ते, विजेची सोय  करून देण्याचे जाहीर केले. तसेच मुस्लिम युवकांना छोट्या उद्योगासाठी वित्त पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  मुस्लिम बांधवांना कधीही कशाची ही अडचण आल्यास आपण  भाऊ म्हणून कायम पाठीशी उभे राहणार आहोत असा मोठा दिलासा त्यांनी दिला. 
यावेळी माजी नगरसेवक शिवाजी मस्के ,पत्रकार अभिराज उबाळे, शहीद टिपू सुलतान युवक संघटना संस्थापक अध्यक्ष जमीर तांबोळी, ए बी ग्रुप अध्यक्ष आदम बागवान ,पत्रकार रफिक आतार , बडा कब्रस्तान अध्यक्ष शफी भाई मुलाणी, प्राचार्य मसुरे सर , गणेश पिंपळनेरकर , रहीम भाई शेख, आसिफ शेख ,सईद सय्यद, मुसा भाई बागवान ,खालिद मुजावर ,मुस्लिम समाजाचे धर्मगुरु हासिम खान, सलीम सय्यद ,जमीर सय्यद, इकबाल चौधरी,इन्नूस झारी आणि इतर मुस्लिम बांधव कब्रस्तान चे विश्वस्त उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form