400 विद्यार्थ्यांचां सहभाग ,गुणवत्ता पूर्ण मॉडेल तसेच नववी व दहावीच्या मुलांचे एक्सपेरिमेंट हे वैशिष्ट्यपूर्ण होते. बाजार डे मध्ये पहिली ते दहावीच्या मुलांनी अतिशय छोट्या व मोठ्या वस्तू स्टाॅलवर विक्रीसाठी ठेवल्या होत्या
पंढरपूर ---(प्रतिनिधी)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल पंढरपूर मध्ये ग्रँड प्रोजेक्ट एक्जीबिशन आणि बाजार डे चे सेलिब्रेशन झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री लिगाडे साहेब, तसेच माजी केंद्र सहाय्यक प्रमुख श्रीमती छाया शिंदे हे कार्यक्रमास लाभले. पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री पटवर्धन सर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मोहोळकर मॅडम व आलेल्या सर्व पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून व फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमांमध्ये जवळजवळ 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गुणवत्ता पूर्ण मॉडेल तसेच नववी व दहावीच्या मुलांचे एक्सपेरिमेंट हे वैशिष्ट्यपूर्ण होते. मुलांनी अतिशय मेहनत करून याची तयारी केली होती. बाजार डे मध्ये पहिली ते दहावीच्या मुलांनी अतिशय छोट्या छोट्या व मोठ्या वस्तू ही विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या प्रोजेक्ट एक्झिबिशन मध्ये जवळजवळ 380 चार्ट होते यामध्ये जवळजवळ 55 मॉडेल्स होते. बाजार डे या कार्यक्रमांमध्ये बेस्ट सेलर अवॉर्ड दिला जातो. तो अवॉर्ड इयत्ता सहावी मधील आदित्य खंबसवाडकर या विद्यार्थ्याला मिळाला.
या कार्यक्रमाचे परीक्षण सौ. अयाचित मॅडम व सौ.नरळे मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले- प्राजक्ता पवार, कल्पना हूच्छे, श्रद्धा दुरूककर, सुषमा बंगाळे, मनीषा थोरात, मीनाक्षी गायकवाड, सविता शिंदे ,वैशाली शिंदे ,प्रार्थना बेणारे, कोमल गायकवाड, कविता जगताप, मोनाली शिंदे ,ज्योत्स्ना अवताडे, राहुल काळे सर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.