सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त दर देणारे टॉप वर असणारे कारखाने म्हणजे, पांडुरंग श्रीपुर, विठ्ठलराव शिंदे माढा, सहकारमहर्षी अकलूज, काल पांडुरंग सह.सा.का.२४०० दर जाहीर केला आहे
मंगळवेढा :(नारायण माने)---
गळीत हंगाम चालू होऊन जवळपास एक महिना होत आलेला आहे तरीही अद्याप ऊसदरापोटी पहिली उचल किती द्यावी ? ही बाब अनिर्णत ठेवून, जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांनी उसाची बिलेही लोंबकळत ठेवलेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकोटीला आलेला आहे.
सहकार कायद्यानुसार शेतकऱ्यांची ऊस बिले ऊस गळपास गेल्यानंतर त्याचे बिल १४ दिवसाच्या आत देण्यास बंधनकारक असताना, उसाची पहिली उचल दर किती असावी ? हा विषय साखर कारखानदारांनी युनिटी करून हेतू पुरस्कार रेंगाळत ठेवले असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेतकरी संघटना २५०० रुपये एवढाच उचल दर दिला पाहिजे यावर ठाम आहे तर हा दर परवडत नसल्याचे सोंग पुढे करून साखर कारखानदार डोळे झाकून बघत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु शेवटी शेतकरीच आर्थिक कोंडीत सापडतोय हे साखर कारखानदारांना माहीत असल्यामुळे काहीतरी निमित्त दाखवून वेळ काढूपणा करून दिवस पुढे ढकलेत नेणे हाच एकमेव पवित्रा अध्याप तरी साखर कारखानदारांनी स्वीकारलेला दिसतोय.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त दर देणारे टॉप वर असणारे कारखाने म्हणजे, पांडुरंग श्रीपुर, विठ्ठलराव शिंदे माढा, सहकारमहर्षी अकलूज, यांनीच बघ्याची भूमिका घेतल्याने आणि बाकीचे तर मग आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार ठरवणार का ? हेच अद्याप कोडे सुटलेले दिसत नाही. तरी पण जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदाराची पहिली उचल जवळपास सारखीच असावी असा रेटा बहुतेक साखर कारखानदारांचा असावा असे वाटते. कालच पांडुरंग श्रीपुर यांनी टनाला पहिली उचल २४०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून सर्वांनाच एक सुखद धक्का दिलेला आहे. दराची कोंडी फुटल्याने यापुढे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने आता बिले देण्यास सुरुवात करतील अशी आशादायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.