विशाल सुरवसे यांची भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड ......

पुढील महिन्यात पंजाब येथे होणार्‍यामिस्टर इंडीया अर्थात भारत श्री या देशपातळीवरील शरिरसौष्ट स्पर्धेसाठी निवड 

पंढरपूर------
येथील विशाल अशोक सुरवसे याने संभाजीनगर येथे पार पडलेल्या खासदार श्री शरिरसौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटाकविला आहे. यामुळे त्याची पुढील महिन्यात होणार्‍या भारत श्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
      महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोसिएशनच्या वतीने संभाजीनगर येथे खासदार श्री चषक पार पडला यामध्ये विशालने रनरप अर्थात दुसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धे मधूनच महाराष्ट्रातून भारत श्री स्पर्धेसाठी खेळाडुंची निवड करण्यात येणार होते. त्यानुसार विशालची पुढील महिन्यात पंजाब येथे होणार्‍या मिस्टर इंडीया अर्थात भारत श्री या देशपातळीवरील शरिरसौष्ट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ज्युनिअर गटातून खेळ सादर करून देखील त्याची वरीष्ठ गटातील भारत श्री स्पर्धेसाठी निवडकर्त्यांनी निवड केली आहे. यापूर्वी विशालने ज्युनिअर महाराष्ट्र श्रीचे पदक पटाकाविले आहे.
या यशाबद्दल त्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे, पांडुरंग सुरवसे, बुरूड समाज युवक संघटना आदींनी अभिनंदन केले
 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form