प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अथक परिश्रमाने मिळविले यश दररोज १००लोकांना देतो रोजगार ----दाजी (राज ) शिंदे
विशेष मुलाखत --
प्रकाश इंगोले( पंढरपूर)
प्रतिनिधी ----
नववीत असताना वडिलांचे निधन झाले आणि आयुष्याला कलाटणी मिळाली येथुन झाला माझा जिवनाचा खरा प्रवास सुरू झाला.गावात अनेक प्रकारचे काबाडकष्टाची कामे करून कूंटुबांचा उदरनिर्वाह चालवत असताना मला जाणीव झाली की आपण काही तरी वेगळे केले पाहिजे याविचाराशी दोन हात करताना मी पुणे शहर गाठण्याचा निर्णय घेतला
आणि माझे आयुष्य व कुटुंबासाठी मेहनतीने व जिद्दीने काही करण्याची प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अथक परिश्रमाने मी आज पुणे येथे स्वताच्या मालकीचे भाग्यश्री ब्रास बॅन्ड अँन् इव्हेंट हि संस्था स्थापन केली आणि आज या संस्थेच्या माध्यमातून १० चारचाकी वाहने व दररोज १०० व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिली आहे. माझा व माझ्या सहकार्याच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याची मी यथाशक्ती मदत करतो सांभाळ करतो.आणि मी आज स्वाभिमानाने जीवन व्यतीत करत आहे
फक्त ९वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या या युवकांची यशोगाथा पाहून आपण म्हणावं वाटलं कि पुत्र असावा असा की त्याचा तिन्ही लोकी झेंडा.
संकलन --रमेश चव्हाण (महुद)