कुर्डुवाडी ---प्रतिनिधी
६ तारखेला एस आर पी पोलीस भरतीसाठी पत्र आले आहे.पोलीस भरतीच्या धावण्याच्या सरावासाठी के एन भिसे महाविद्यालयाच्या मैदानात गेले होते सराव करून चुलतभाऊ दयानंद विठू उबाळे यांच्याबरोबर चिंचगाव या गावी मोटरसायकल वरून परत जात असताना वैशाली हॉटेल च्या पुढे पीक अप ने समोरून धडक दिल्याने लोहमार्ग छोटी लाईनच्या दगडावर डोके आढळल्याने डोक्यास मार लागून झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला ही घटना सायंकाळी ६ वा ४२ मी वाजताच्या सुमारास चिंचगाव शिवारातील वैशाली हॉटेल च्या पुढे बार्शीकडील बाजूस असलेल्या छोट्या पुलाजवळ घडली.घडली .
दयानंद यांच्या उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली लागून जखमी झाला त्याला उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शुभम भागवत उबाळे वय १९ रा.चिंचगाव ता.माढा असे मयत युवकाचे नाव आहे.एम एच १९/सी वाय ७३०० या पिकपने एम एच १२/इ व्ही ९०४२ या नंबरच्या मोटरसायकल ला समोरून धडक दिली होती .रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती