अजनसोंड गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे पंढरपूर येथे सी.ओ.ना देण्यात आले निवेदन ----म.न.से.

 निकृष्ट दर्जेच्या कामाची लवकरात लवकर दखल घ्यावी ,ग्रामपंचायतीवर व  भ्रष्ट आधिकारी , कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी 
 
पंढरपूर----(विनोद पोतदार)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मा.श्री शशिकांत आप्पा पाटील यांनी अजनसोंड गावातील  पाणी पुरवठा योजनेचे निकृष्ट दरजेची काम झालेली असल्याने सोलापूरचे सिओ पंढरपूरला आले असताना त्यांना निवेदन देण्यात आली की,अजनसोंड गावातील निकृष्ट दर्जेच्या कामाची लवकरात लवकर दखल घ्यावी व ग्रामपंचायतीवर व  भ्रष्ट आधिकारी वर कारवाई करण्यात यावी.यासंदर्भात चर्चा करताना सोलापूर चे सीईओ साहेब व पंढरपूर चे बिडीओ साहेब काळे यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केली तसेच त्यांना सांगण्यात आले कि या अगोदर देखील २१ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

       तरी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी बिडीओ ऑफीस च्या समोर रस्ता रोको आंदोलन मा.दिलीप बापु धोत्रे (मनसे नेते) याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असा  इशारा मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांनी दिला.यावेळी मनसे विद्यार्थी सेना पंढरपूर शहराध्यक्ष अवधूत गडकरी,रोहन पंढरपूरकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form