विठ्ठल मंदीर प्रवेश सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा व वै. श्री. संत तनपुरे बाबा यांचा ३७ वा पुण्यतिथी सांगता समारंभ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते


वै. श्री संत तनपुरे बाबांनी भारत जोडो अभियानांतर्गत चारोधाम बाराज्योतिलींग संपूर्ण भारताची पायी पदयात्रा करून संतांचा विचार तसेच वारकरी संप्रादायाचा प्रसार केला त्या यात्रेचा यावर्षी अमृत महोत्सव आहे तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भुकेल्यांना अन्न या माध्यमातुन अन्नदान सेवाकार्य चालु केले. त्याचाही अमृत महोत्सवी वर्ष चालु आहे वै. तनपुरे बाबा ३७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधुन श्री. संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट अमृत महोत्सव सोहळा साजरा करीत आहे.

पंढरपूर ---(विनोद पोतदार)
          मंगळवार दि.८नोव्हेंबर२०२२ रोजी सकाळी ११ वा. तनपुरे मठ येथे विठ्ठल मंदीर प्रवेश सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा  व वै. श्री. संत तनपुरे बाबा यांचा ३७ वा पुण्यतिथी सोहळा सांगता समारंभ
मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब(मा. कृषीमंत्री भारत सरकार) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.श्री. बबनदादा शिंदे असतील तर स्वागताध्यक्ष श्री.ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे असतील अशी माहिती ट्रस्टचे सचिव दादासाहेब रोंगे यांनी दिली .

     प. पु. साने गुरुजी समता दिडी व
विश्व एकात्मता दिंडी सोहळा दि. ०७ नोव्हेंबर सोमवार २०२२रोजी अखिल महाराष्ट्रामधून येणान्या भाविक भक्तांच्या सोबत पं.पु.बाबांची जन्मभुमी गु. दगडवाडी ता. पाथर्डी, अ.नगर आणि कर्मभुमी मु.तेरखेडा जिल्हा उस्मानाबाद व मु.काकांडी ,मु.बेटमोगरा  टाकळी जि.नांदेड येथुन तर श्री. संत तनपुरे बाबा दिडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.  सकाळी निघून ते सांय ४वा. श्री. क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहेत त्यानंतर प्रदक्षिणा मार्गा ने शोभायात्रा व प.पु. बाबांची पालखी मिरवणूक सोहळा होणार आहे तनपुरे मठ येथे रात्री ७वा. समाधी अभिषेक, महापुजा व शांतीपाठ (प्रार्थना) होईल नंतर समाधी दर्शन सोहळा होईल.रात्री ९.३०वा.साने गुरूजी विचार मंथन बैठक होईल असे त्यांनी सांगितले. 

       दि८नोंव्हेबर रोजीच्या मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा देशाचे नेते मा.खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे तर
तनपुरे बाबा यांच्या ३७ व्या.पुण्यतिथी सोहळा सांगता समारंभ संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.बबनदादा शिंदे तर स्वागताध्यक्ष ह.भ.प.बद्रिनाथ महाराज तनपुरे असणार आहेत तर अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती ह.भ.प.श्री.बाळासाहेब महाराज देहुकर,
ह.भ.प. श्री. जयवंत महाराज बोधले ,
ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर 
मा. आ. श्री. समाधान आवताडे,मा.आ.श्री. प्राजक्त (दादा) तनपुरे,
 मा. आ. श्री. शहाजीबापू पाटील ,मा. आ. श्री. प्रशांतराव परिचारक ,
मा. आ. दिपक (आबा) साळुंखे,
मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील ,मा. सौ. साधनाताई नागेश भोसले,मा.श्री. भगिरथ (दादा) भालके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा होणार आहे.या कार्यक्रमासाठी साने गुरुजी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
     

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form