पुळूज गटातून विश्वराज महाडिक तर संस्था प्रतिनिधी गटातून खासदार धनंजय महाडिक निवडणूक रिंगणात
सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीची मोहोळ व पंढरपूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. भीमा कारखान्याच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवशी
चौकट
पाटील गट व परिचारक गटाचे खंदे समर्थक असणारे आजी माजी संचालक मंडळी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत ऊस उत्पादक शेतकरी व सभासद सुज्ञ असून येत्या काळात त्यांची जागा दाखवून दिली शिवाय राहणार नाहीत असे युवा उद्योजक व उमेदवार विश्वराज महाडिक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
सत्ताधारी पॅनल म्हणजेच खा. धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या "भीमा शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली .यामध्ये पुळुज गटातून विश्वराज धनंजय महाडिक, बिभिषण बाबा वाघ (फुलचिंचोली),टाकळी गटातून सुनिल रावसो चव्हाण, (टा.सिंकदर)
संभाजी नामदेव कोकाटे(तांबोळे)
सुस्ते गटातून संतोष चंद्रकांत सावंत (मगरवाडी), तात्यासो ज्ञानोबा निगटिळक (सुस्ते),अंकोली गटातून सतीश नरसिंह जगताप (सोहाळे) गणपत महादेव फुले(शेज बाभुळगाव),कोन्हेरी गटातून राजेंद्र गोरख टेकाळे(पापरी), महिला राखीव गटातून सिंधू चंद्रसेन जाधव (कुरुल),प्रतिक्षा बाबुराव शिंदे (औंढी),इतर मागासवर्ग गटातून अनिल आगतराव गवळी(पेनुर),भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातून सिद्राम ज्ञानोबा मदने(पुळूजवाडी), अनुसूचित जाती/जमाती बाळासो बापु गवळी (बेगमपुर), संस्था प्रतिनिधी गटातून धनंजय भिमराव महाडिक (पुळुज)
असे उमेदवार असून भीमा शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचे नावे असुन सर्व. जेष्ठ सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, जेष्ठ नागरिक व सर्व पक्षांतील जानकरांना विचारात घेऊन विचार विनिमय बैठक घेऊन जाहीर करण्यात आले आहे.
तर या निवडणुक प्रक्रिया व निकालाकडे शेतकरी उत्सुकतेने पहात आहे. या निवडणुकीसाठी गाठीभेटी, विशेष बैठका तसेच सभासद यांना विश्वासात घेत प्रचार करताना संपूर्ण भिमा परिवर प्रयत्नशील दिसून येते आहे.
चौकट
भिमा परिवर व विठ्ठल परिवार एकत्र
२०११ मध्ये झालेल्या भीमा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सर्व ताकदीनिशी मैदानात उतरले आणि त्यावेळेस स्वर्गीय आमदार भारत नाना भालके, (संपूर्ण विठ्ठल परिवार)धनंजय महाडिक यांच्या पाठीशी भक्कम उभा राहिला आणि पंचवार्षिक निवडणुकीत चारी मुंड्याचित करीत विजय संपादन केले.
गेल्या १० वर्षाच्या साखर कारखानाच्या राजकारणात कल्यानराव काळे , अभिजित पाटील यांनीही त्यांना मोलाची साथ दिली आणि दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीत हि त्यांनी विजय मिळवला.