संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे ७५२ व्या जयंती निमित्त संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रा पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची सायकल यात्रा दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२२
पंढरपूर ---(विनोद पोतदार )
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे ७५२ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा शुभारंभ पंढरपूर येथे कार्तिक शुध्द एकादशी दिवशी पहाटे ५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला .
भागवत धर्म प्रसारक समिती , पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व श्री नामदेव दरबार कमिटी , घुमान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची सायकल यात्रा दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२२ या दरम्यान काढण्यात आली आहे .
कार्तिक शु|| एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५२ वी जयंती , संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर सायकल रायडिंग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकलपटूनी सहभाग नोंदविला आहे. ही रथ व सायकल यात्रा महाराष्ट्रासह गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे . राष्ट्रीयस्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा असून या यात्रेद्वारे भागवत धर्माच्या शांती , समता आणि बंधूता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार असल्याचे या यात्रेचे संयोजक व भागवत धर्म प्रसारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी सांगितले