मंगळवारी मंगळवेढा येथेह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे होणार किर्तन

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या धर्मपत्नी स्व. अनुराधाताई ढोबळे यांच्या जयंती निमित्त
पंढरपूर, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या धर्मपत्नी स्व. अनुराधाताई ढोबळे यांच्या जयंती निमित्त मंगळवार दि. 29 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे ‘अनुसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर (आळंदीकर) यांच्या किर्तनाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले सुत गिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे यांनी दिली आहे.
या अनुसंध्या कार्यक्रमाचे आयोजन शाहू शिक्षण संस्था, सावली फांउडेशन, बहुजन रयत परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किर्तनाचा कार्यक्रम मंगळवेढा येथील शाहू मैदान येथे आयोजिला आहे. हा कार्यक्रम मंगळवारी सायं 6 वाजता सुरु होणार आहे. हा किर्तन सोहळा माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरचे खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ. विजयकुमार देशमुख हे प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मंगळवेढ्याचे माजी नगराध्यक्षा अरुणाताई माळी पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील यांच्या हस्ते उपस्थित 41 महाराजांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अलौकिक प्रतिभेचे देणे लाभलेल्या व अध्यात्मीक शक्तीचे निरुपणकार असलेल्या कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचा तसेच देव भूमीवरील प्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यातील तमाम किर्तनप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, विश्वस्त क्रांती आवळे, विश्वस्त कोमल साळुंखे, अजय साळुंखे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form