कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी. पी. रॉगेसर यांचे शुभहस्ते संपन्न
वेणुनगर पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन कर्मबीर के. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांची ९९ वी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी. पी. रॉगेसर यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, तसेच धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन बाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य नागटिळक सर व त्यांचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कर्मवीर औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली.