भिमा सहकारी साखर कारखाना नुतन संचालक मंडळ व नुतन युवा चेअरमन म्हणून विश्वराज महाडिक यांच्या नावाची होणार घोषणा ?
पंढरपूर--- (विनोद पोतदार)
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीने एक हाती तिसऱ्यांदा वर्चस्व मिळवित विजय संपादन केला.
कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी उद्या गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०वा.होणार आहेत. अध्यक्षपदासाठी विश्वराज महाडिक आणि उपाध्यक्षपदा साठी पुन्हा सतीश जगताप यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी विश्वराज महाडीक यांच्या निवडीचे संकेत खासदारांनी सभेतही दिले होते. त्यामुळे त्यांच नांव निश्चीत मानल जात आहे. उपाध्यक्षपदासाठी सतीश जगताप यांनाच पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता असली तरी ऐनवेळी नव्या नावावरही शिक्कामोर्तब होवू शकतो अशीही चर्चा कारखाना वर्तुळात आहे.