आमदार मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त विनोदराज लटके मित्रपरिवार व पंढरपूर रनर असोसिएशन यांच्यावतीने पंढरपूर येथे आमदार शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या समारंभस पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री.अरुण फुगे साहेब व मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार समाधान यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थी दशेत मुला, मुलींना शाररीक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी व पर्यावरण हित जोपासण्यासाठी अशा विविध स्पर्धा आयोजित होणे काळाची गरज आहे. सदर स्पर्धेत तब्बल दीड हजार स्पर्धकांनी ( मुले व मुली) सहभाग घेतला होता.
यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले, या समारंभ पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी या स्पर्धेत विशेष सहकार्य पंढरपूर पोलिस वाहतूक शाखेचे पवार साहेब, माने साहेब व रनर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कडून झाले.यावेळी सर्व आवताडे प्रेमीं नागरिक, व्यापारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.