जिल्हा कोषागार कार्यालयात अँटीकरप्शनची रेड ....लाच घेताना महिला लिपिक रंगेहाथ

उपअधीक्षक कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई...... 

सोलापूर-----
 (प्रतिनिधी प्रकाश इंगोले)
सोलापूर :  जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांचं लाचखोर प्रकरण उघडकीस येऊन ४८ तास उलटत नाहीत तोच आज आणखी एक सरकारी कर्मचारी महिलेस लाच घेताना पकडण्यात आलं आहे. 
सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी  बडवणें यांना ४५०० रुपयांची लाच घेताना सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सायंकाळी कार्यालयात रंगेहात पकडलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच कारवाई झाली आहे.
पेन्शनच्या प्रकरणावरून जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला कनिष्ठ लिपिक बडवणे यांनी लाच मागितली होती. 
तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा लावला होता.
 लाच स्वीकारताना महिला कर्मचारी बडवणे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form