श्री दत्त मंदिर नाझरे वझरे येथे प्रवचनात "प्रपंच करावा नेटका मग करावे परमार्थ"मानवी जीवन व्यतीत करत असताना नामस्मरण करीत रहा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला
नाझरे-- प्रतिनिधी--
सध्या मानवी जीवनात लोकांना चांगले बघवत नाही मग ते शिक्षणात असो प्रपंचात अगर शेती व्यवसायात असो व त्यावेळी आपलीच माणसे विरोध करतात यासाठी असे न करता मानवी जीवनात चांगले वागा व प्रपंच करून परमार्थ करा परंतु हे करताना भक्तीचा विसर पडता कामा नये व श्रीदत्त प्रभूच्या छाय छत्राखाली येऊन नामस्मरण करा भक्ती करा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही त्यामुळे भक्ती हीच खरी शक्ती आहे व निष्ठेने भक्ती केल्यास यश हमखास प्राप्त होईल असे गुरुवर्य भालचंद्र पाटील यांनी श्री दत्त मंदिर नाझरे वझरे येथे प्रवचनात सांगितले
मी एक सर्वसामान्य माणूस असून मला स्वतःला अनेक अडचणींना तोंड द्यावी लागले व श्री गुरुदेव दत्त नरसिंह सरस्वती दत्त मंदिर मोराळे पेड ता तासगाव येथे नामस्मरण सुरू करून गुरुचरित्र महिमा यांचे अवलोकन केले व नुसते हात जोडून भक्ती होत नाही व यासाठी तुम्ही संकटातून शारीरिक व्याधीतून अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुमच्या कुलदैवताचे नामस्मरण करा व एकदा गाणगापूर मोराळे येथे जाऊन या व आंधळी भक्ती करू नका कारण देवांना सुद्धा त्रास झाला मग तुम्ही आम्ही तर कोणी यासाठी अहंकार मनी बाळगू नका व निष्ठेने भक्ती करा
ब्रह्मा विष्णू व महेश मिळून श्री दत्त झाले व त्यामुळे शक्ती व मुक्ती देणारा गुरुदेव दत्त आहे व परमेश्वरावर विश्वास ठेवून व अंधश्रद्धेस मोठ माती देऊन मांसाहार व व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे व शिवदत्ताची भेट होण्यासाठी एक वेळ मोराळला या असा मौलिक सल्ला ही पाटील यांनी दिला