टॅक्टर ट्राॅली,बैलगाडी या वाहनांचे पाठीमागील बाजुस रिप्लेक्टर लावणे बंधनकारक असलेचे मंगळवेढयाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल बामणे
मंगळवेढा : (नारायण माने)
देशातील सर्वच साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले असुन रात्रंदिवस मोठया प्रमाणावर ऊस वाहतुक सुरु झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व शहरी रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. ऊसाने भरलेली वाहने रात्री अपरात्री रत्यावरुन जाताना सुरक्षीततेच्या नियमाचे पालन करणेसाठी टॅक्टर ट्राॅली,बैलगाडी या वाहनांचे पाठीमागील बाजुस रिप्लेक्टर लावणे बंधनकारक असलेचे मंगळवेढयाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल बामणे यांनी कारखान्यावरील रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत रिप्लेक्टर लावणेचे कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगीतले.
मोठया आवाजात टेपरेकॉर्डर चालु करुन वेगाने वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला जाईल
ऊसाने भरलेल्या वाहनास पाठीमागे रिप्लेक्टर नसल्यास व पुढुन वाहन येत असल्यास त्याच्या हेडलाईटमुळे मागुन येणार्या वाहनांना अंधारात कांही दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असतेतसेच टॅक्टरचे ड्रायव्हर ऊस वाहतुक करत असताना मोठया आवाजात टेपरेकॉर्डर लावुन वेगाने वाहन चालवत असतात त्यांना पाठीमागील वाहनांचा अंदाज येत नाही अशावेळी अपघात होवु शकतात मोठया आवाजात टेपरेकॉर्डर चालु करुन वेगाने वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला जाईल अशी सुचनाही त्यानी यावेळी केली तसेच रस्ते वाहतुकीचे नियमही सर्व उपस्थित वाहन चालकांना समजावुन सांगीतले
सदर प्रसंगी कारखान्याचे ऊस वाहतुकीस असणार्या वाहनांना मा चेअरमन शिवानंद पाटील, व्हा चेअरमन तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील,सुरेश कोळेकर,महादेव लुगडे, मंगळवेढा पोलीस स्टेशनचे काॅन्सटेबल महेश पोरे,सोमनाथ माने यांचे हस्ते रिप्लेक्टर लावणेत आले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे संचालक रेवणसिध्द् लिगाडे यांनी केले या कार्यक्रमासाठी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री कृष्णात ठवरे, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, ई डी पी मॅनेजर मनोज चेळेकर, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील,सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, ऊस पुरवठयासाठी असलेल्या वाहनांचे मालक,चालक व कर्मचारी उपस्थित होते.