एकूण १५ जागांसाठी हि निवडणूक
१९३८३ मतदार,४३ ठिकाणी ५६ मतदान केंद्रे तर११ संवेदनशील मतदान केंद्रें
मोठा पोलिस बंदोबस्त १६० पोलिस कर्मचारी व अधिकारी
सोलापूर येथे सिध्देश्वर सह.सा.कारखाना मंगल कार्यालय येथे उद्या सोमवारी सकाळी होणार मतमोजणी
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या
निवडणुकीच्या निमित्ताने भीमा सहकारी साखरकारखान्याच्या पंढरपूर - मोहोळ - मंगळवेढा यातीन तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मागीलकाही दिवस जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापने पासून सुरुवातीची 14 वर्षे सोडली तर भीमाच्या प्रत्येक निवडणुकीत महाडिक विरुद्ध राजन पाटील - परिचारक अशी लढत होताना दिसून आली.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या11वर्षांपासून महाडिक यांनी मोहोळ तालुक्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावण्यास सुरुवात केली. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाडिक गट सक्रिय राहिला, तालुक्यातील राजन पाटील विरोधकांची मोट बांधण्यात महाडिक यांनीही प्रभावी भूमिका बजावत तालुक्यातील सत्ता स्थानात या विरोधी गटाने प्रभावी भूमिका बजावली.
भीमा परिवार, विठ्ठल परिवार एकत्र येऊन या निवडणुकीत प्रचार करताना दिसुन येत होता त्याच बरोबर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भिमा परिवारास सहकार्य केले आणि हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मुन्ना महाडिक यांनी गेल्या ११वर्ष कारखाना चालवत असताना अनेक निर्णय शेतकरी हितासाठी घेऊन कारखाना सुरू ठेवला विरोधकांनी अपप्रचार करत सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांची देशाभूल करत असल्याचे आपल्या प्रचार सभेत त्यांनी सांगितले आहे.
आज सकाळपासून दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रावर सरासरी ५० टक्के मतदान झाले असून खा.मुन्ना महाडिक व विश्वराज महाडिक यांनी पुळूज येथिल मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.या निडणूकीत महाडिक भिमा विकास पॅनल व पाटील परिचारक प्रणित भिमा बचाव परिवर्तन यांच्यात कमालीची चुरस असल्याचे दिसून येत आहे.या निवडणूकीचे निर्णय अधिकारी म्हणून मा.कुंदन भोळे काम पहात आहेत.