समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम...
पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी वाढदिवसानिमित्त पंढरपूरातील मदरसामधील लहान मुलांची आरोग्य शिबीर तपासणी आयोजन करण्यात आले होते.त्या बरोबरच मोफत औषधोपचार देण्यात आले.
पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे नेहमीच जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवा करत असतात कोव्हीड काळात ही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्याचे टाळुन तोच खर्च ते चांगल्या कामासाठी वापरतात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यातला एक भाग म्हणून टाकळी येथील दाऊल उलम सुफिया व सांगोला रोड येथील फातीमातुन जोहरा या मदरशात सर्व मुलांचे,मौलाना व स्टाॅफची मोफत तपासणी व औषधोपचार शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात डाॅ करीम साहेब व डाॅ विजय चौहान यांनी लहान मुलांची तपासणी केली.दाऊल उलम सुफिया मदरशाचे वसीम तंबोळी व फातीमातुन जोहरा मदरशाचे मौलाना अब्दुल मजीद गफूर बागवान यांनी समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना जन्मदिनाच्या शुभेच्या दिल्या तसेच त्यांच्या सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या व या शिबीरास त्यांचे आभार मानले आहेत