सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदी मा.संप्रदा बीडकर

श्रीमती बीडकर यांनी यापूर्वी माहिती अधिकारी म्हणून डहाणू, मंत्रालय, कोल्हापूर, सांगली येथे काम केले आहे

सोलापूर,दि.1 (जिमाका)  
        बीडच्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी आज सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार घेतला आहे. 

श्रीमती बीडकर यांनी यापूर्वी माहिती अधिकारी म्हणून डहाणू, मंत्रालय, कोल्हापूर, सांगली येथे काम केले आहे. सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयात माहिती सहायक धोंडिराम अर्जुन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी दूरमुद्रणचालक शरद नलवडे, लिपीक आराध्या लोंढे, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्याकडे वर्षभरापासून सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form