कार्तिक वारीसाठी पायी निघालेल्या वारकरी दिंडीत घुसला टेम्पो ...... ७ वारकरी ठार अनेक जण जखमी

मुख्यमंत्री यांची त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची  मदत 
वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले.

पंढरपूर ---(विनोद पोतदार)
कार्तिक वारी साठी पंढरपूर पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसला. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील जुनोनी बायपासजवळ घडली.
या घटनेतील मृत व जखमींचा आकडा अद्याप समजला नाही. सांगोला पोलिस घटनास्थळी दाखल दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलविण्याचे काम वेगाने सुरू आहे.अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत 

मुख्यमंत्री यांची त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची  मदत वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले.
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
 
 मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेतअपघातातील सर्व मृत हे कोल्हापूरजिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील आहेत.मृतांमध्ये पाच महिला, एक पुरुष, एक लहान मुलगा यांचा समावेश आहे.
मृत वारकऱ्यांची नावे,शारदा आनंदा घोडके,सुशीला पवार,रंजना बळवंत जाधव,
गौरव पवार,सर्जेराव जाधव,सुनिता सुभाष काटे,शांताबाई शिवाजी जाधव हे सर्वजण राहणार करवीर तालुक्यातील आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form