अवैध वाळू उपसा व वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई .... कारवाईसाठी महसूल पथकाची नेमणूक तहसिलदार- सुशिल बेल्हेकर

पंढरपूर (विनोद पोतदार):- 
 अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने इसबावी हद्दीतील सांगोला पाणीपुरवठा योजनेजवळ अवैध वाळू उपसा करुन वाहतूक  करताना टेम्पो पकडला असून, सर्व मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी पथकाची  नेमणूक केली आहे.

भीमा नदी पात्रातील  इसबावी हद्दीतील सांगोला पाणीपुरवठा योजनेजवळ अवैध वाळू उपसा करुन वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली.  शनिवार दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे तीन वाजता पथक सदर ठिकाणी दाखल झाले. सकाळी 6.00 वाजता अवैध वाहतूक करणारा टेम्पो पथकाने पकडून जप्त केला व  शासकीय धान्य गोदाम येथे लावण्यात आला. सदर वाहनांवर तसेच संबधितांवर गौण खनिज अंतर्गत  कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली. या पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, तलाठी प्रशांत शिंदे सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form