पंढरपूर (विनोद पोतदार)
भारतीय जनता पार्टीच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी, राजकुमार (पिंटू) टरले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे आ. प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यातील परिचारक समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
राजकुमार ज्ञानेश्वर टरले हे भोसे गावचे रहिवासी असून, अनेक वर्षापासून परिचारक समर्थक राहिले आहेत. भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी त्यांना निवडीचे पत्र शुक्रवारी सन्मानपूर्वक दिले. यानंतर जिल्ह्याचे आ. प्रशांत परिचारक यांनी त्यांचा सन्मानही केला. या निवडीचे वृत्त तालुक्यात समजताच , सबंध तालुक्यातून राजकुमार टरले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या निवडीमुळे, तालुक्यातील अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
बागायतदार, प्रगतशील बागायतदार ते भाजपाचे पदाधिकारी असा प्रवास करणाऱ्या राजकुमार टरले
यांच्या खांद्यावर, भाजपाने पक्षवाढीची जबाबदारी टाकली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाभर भाजपाची ध्येयधोरणे तळागाळात पोचवण्याचे काम आपण करणार असल्याची प्रतिक्रिया, राजकुमार (पिंटू) टरले यांनी दिली आहे.