प्रत्येक ४०००/-₹ दिव्यांग निधीचे वाटप
पंढरपूर ----(विनोद पोतदार)
कोर्टी येथे ग्रामपंचायती मार्फत दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत दिव्यांग निधीतून कोर्टी येथील अपंग नागरिकांना कोर्टी ग्रामपंचायती तर्फे धनादेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच रघु पवार म्हणाले की कोर्टी गावातून १७ दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी ४०००/-₹ प्रमाणे ग्रामपंचायत दिव्यांग निधी तून धनादेश वाटप करण्यात आले, यावेळी ग्रामविकास अधिकारी कदम, उपसरपंच महेश शेडगे, ग्रामपंचायत सदस्य पोपट हाके, अझरुद्दीन शेख, मुन्ना शेख, सत्यवान मस्के , सिकंदर मुलाणी,भारत पवार, मज्जित पाटील, राजू शेंबडे ,समाधान शेंडगे, अभिजीत हाके, माजी ग्रामपंचायत सदस्य शरीफ शेख व दिव्यांग व्यक्ती, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते