पंढरपूर ---(विनोद पोतदार)
तालुक्यातील कोर्टी येथील परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे व तसेच गटारी व सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे व परतीचा पाऊस चालू झाल्यामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे नागरिकांच्या घरामध्ये व रस्त्यावर येत आहे ठिकठिकाणी गटारी तुंबल्यामुळे गटारीतून घाण पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत असून येथील राहणाऱ्या नागरिकांचे आरोग् धोक्यात येत आहे या गटातील पाणी ठीक ठिकाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांना डेंगू मलेरिया यासारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे गेली एक वर्षापासून या गटारीचे अपूर्ण काम राहिल्यामुळे येथील नागरिकांना मलेरिया डेंगू सारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे तरी ग्रामपंचायती कडे वेळोवेळी सांगून सुद्धा दुर्लक्ष होत आहे तरी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कोर्टी येथील नागरिक करीत आहेत