चालू गळीत हंगामासाठी ३५ हजार एकर क्षेत्राची ऊसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे १२ ते १५ लाख मे. टन गाळप होणार आहे
पंढरपूर---(विनोद पोतदार)
पंढरपूर तालुक्यातील वेणूनगर श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या सन २०२२- २०२३ चे गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्याचे पुजन कारखान्याचे संचालक श्री कालिदास पाटील, ज्ञानोबा कराळे, मधुकर नाईकनवरे, विभिषण पवार, हनुमंत सुरवसे, बाळासाहेब कौलगे, आशिष यादव, दिनकरबापू कदम, पंढरीनाथ लामकाने, महादेव नाईकवरे, इस्माईल मुलाणी, नामदेव ताड, सुभाष भोसले, अॅड. सारंग आराध्ये, एच. एम. बागल व भिमराव रोंगे यांचे शुभहस्ते व चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील, मार्गदर्शक श्री बब्रुवाहन रोगेसर व व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील म्हणाले की, कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी ३५ हजार एकर क्षेत्राची ऊसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे १२ ते १५ लाख मे. टन गाळप होणार आहे. त्याकरिता कारखान्याने सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभी केलेली आहे. कारखान्याचे गाळप व्यवस्थितरित्या सुरु झाले आहे. वचननाम्यामध्ये दिल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही सर्व दिलेल्या शब्दांचे पालन केलेले आहे व येथून पुढेही पालन करु. आम्ही सत्तेवर आलेपासून अवघ्या १५ दिवसामध्ये कारखाना चालू केलेला आहे. कारखाना चालू करणेसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक, वर्क्स मैनेजर, चिफ केमिस्ट व सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कारखाना चालू केलेला आहे व आज पाडव्याच्या मुहुर्तावरती पहिल्या ११ साखर पोत्याचे पुजन संपन्न झाले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे कौतुक केले. संचालक मंडळाने ठेवलेल्या ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करणेसाठी सभासदांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व ऊसाचे आम्ही गाळप करणार असल्याचे सांगीतले.
स्वागत व प्रस्ताविक प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी केले.
सदर प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक श्री बब्रुवाहन रोंगे सर, कार्यलक्षी संचालक श्री तुकाराम मस्के सर, माजी संचालक श्री नामदेव ता. माजी नगराध्यक्ष श्री सुभाष भोसले, चंद्रभागा कारखान्याचे माजी संचालक इस्माईल मुलाणी, मधुकर नाईकनवरे, चंद्रभागा कारखान्याचे संचालक श्री दिनकरबापू कदम,श्री किरण घोडके, श्री शि लवटे, अॅड. सारंग आराध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश मुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोडले, तसेच प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड व सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.