पंढरपूर----(विनोद पोतदार)
पंढरपूर शहरात सध्या राजरोसपणे मटका हातभट्टी दारू जुगार वाळूची तस्करी इत्यादी अवैध धंदे सुरू असून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी योग्य नियोजन व शहरातील नागरिकांना सुरक्षित व शांततेत राहण्यासाठी व शहरातील गुंडागर्दी, वाळू तस्करी करणाऱ्यांची हाय गय करणार नसून त्यांच्या बंदोबस्त करणार असल्याची माहिती पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
शहरांमध्ये अवैद्य धंदे सुरू असल्याचे समजले असून कोणत्याही ठिकाणी असे धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून ते धंदे पूर्ण बंद करणे आहे .त्याचबरोबर शहरातील रोड रोमिओ तसेच महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमीओवर कारवाई करण्यात येईल तसेच शहरातील भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असून त्यावर आळा बसेल अशी कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांची बदली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे झाली असून त्यांच्या ठिकाणी कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे अरुण फुगे यांची नियुक्ती झाली आहे .आता ते आपल्या कार्यशैलीचा ठसा आपल्या कामाद्वारे दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले .पंढरपूर शहरात आजही राजरोसपणे होणारी चोरटी वाळू वाहतूक. दादागिरी तसेच शहरातील वाहतूक शाखेला आलेला विस्कळीतपणा या सर्व गोष्टीचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे त्यांच्या या कारकिर्दीकडे पंढरपूर शहरवासी यांचे लक्ष लागली आहे.