पुरुषांइतकेच मानधन महिला खेळाडूंना
भारतीय क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली:----(सौ.दै.लोकसत्ता)
देशातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये स्त्री-पुरुष समानता आणण्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वार्षिक क्रिकेटपटूंना करारबद्ध महिला आता क्रिकेटपटुं इतकेच सामन्याचे मानधन देण्याचा निर्णय 'बीसीसीआय'ने गुरुवारी जाहीर केला.
भारताच्या महिला आणि पुरुषआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना आता एका कसोटी सामन्यामागे १५ लाख, एकाएकदिवसीय सामन्यामागे ६ लाख आणि एका ट्वेन्टी-२० पुरुष सामन्यामागे ३ लाख रुपये असे समान मानधन मिळणार आहे.