पत्रकारांच्या प्रश्नावर दत्तात्रय पवार आक्रमक वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणार


सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने  राज्यातील पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकरिता विमा योजना स्वतः च्या मालकीची पक्की व हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना   यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती खंडणी व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राज्यातील ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमणे राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील सर्वच युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या 

पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत इत्यादी पत्रकारांच्या जिव्हाळ्या च्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करत असून पत्रकार सुरक्षा समितीने राज्यातील अनेक पत्रकारांचे प्रश्न सोडवले असून उर्वरित पत्रकारांच्या प्रश्नावर आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा निर्धार 
*पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांनी व्यक्त केला आहे*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form