मोहोळ नगरीत फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन


पंढरपूर : (विनोद पोतदार)
मोहोळ शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नव्याने सुरू झालेल्या फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन मा श्री राजनजी पाटील साहेब माजी आमदार मोहोळ मा‌.श्री‌‌. भाऊसाहेब आनंद रुपनर अध्यक्ष फॅबटेक उद्योग समूह मा.श्री‌. शैलेश झाडबुके साहेब अध्यक्ष मोहोळ डॉक्टर असोसिएशन यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे डॉक्टर सुरज रुपनर, 

आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना फॅबटेक सिटी स्कॅन सेंटरचे
डॉक्टर सुरज रुपनर म्हणाले की मोहोळ नगरी मध्ये शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना सिटीस्कॅन तपासणी करता येणार आहे. या सिटीस्कॅन तपासणी मध्ये विविध आजारावरील निदान केले जाईल यामध्ये मेंदूचे स्कॅन तसेच मेंदू मधील रक्तस्त्राव, मेंदूवरील सूज, डोक्यात झालेली इंजुरी व ब्लड या सर्व गोष्टी चे निदान होणार आहे. 

त्याच बरोबर छातीचे स्कॅन करता येणार असून दम लागणे किंवा छातीमध्ये जर एखादी गाठ असेल तर त्याचे स्कॅन करून निदान करण्यात येईल. पोटाचे विविध आजार व विकार असतील तर त्याचे देखील स्कॅन मध्ये निदान करता येणार आहे.  रुग्णांना आवश्यक असणारी एच आर सि टी तपासणी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. मोहोळ येथील बी.एन गुंडमार्केट सिमोल्लंघन रोड पहिला मजला नजिक रुग्णांच्या विविध आजारावरील निदानाकरिता फॅबटेक सिटी स्कॅन सेंटर च्या माध्यमातून 24 तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी त्यांच्या आजारावरील निदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुरज रुपनर (एमडी, रेडिओलॉजिस्ट) यांनी केले आहे. याप्रसंगी मोहोळ शहरातील मान्यवर डॉक्टर मंडळी, वकील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form