ऊस दर आंदोलन संघर्ष समितीची केली स्थापना पंढरीत होणार २३ ऑक्टोबर रोजी ऊस परिषद सर्व शेतकरी संघटना एकत्र


पंढरपूर, (विनोद पोतदार)

सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना एकत्र येत आज सोलापूर जिल्ह्यातील ऊस कारखानदार पुणे, सातारा, सांगली या धरतीवर सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ऊस दर द्यावा यासाठी ऊस दर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्याच बरोबर २३ ऑक्टोबर रोजी येथील शिवतीर्थावर ऊस दर परिषद होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली.

येथील रेस्टहाऊस मध्ये सोलापूर जिल्हातील शेतकरी संघटनेची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनशक्ती शेतकरी संघटना व इतर शेतकरी चळवळीत काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते.
इतर जिल्ह्यांतील कारखाने २७००ते३३०० रुपये भाव देतात मग आपल्या सोलापूर जिल्हयात का मिळत नाही ? अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आणि एकत्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली.या बैठकीत ऊस दर आंदोलन संघर्ष समिती स्थापन केली. या समिती मध्ये सर्व शेतकरी संघटनेचे दोन दोन पदाधिकारी घेतले आहेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील ऊस पट्ट्यात जाऊन शेतकर्यांना जागृत करून ऊस आंदोलन मध्ये सामील व्हा असे आव्हान करणार आहेत.

रविवार दि. २३/१०/२०२२ रोजी संध्याकाळी सहा वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात सोलापूर जिल्ह्याची ऊस परिषद येणार आहेत आणि येणाऱ्या हंगामात ऊसाला पहिली उचल किती घ्यायची हे जाहीर करणार आहेत.

यावेळी दिपक भोसले, माऊली हळणकर, सचिन पाटिल, समाधान फाटे, नितीन बागल, निवास नागणे, प्रा सुहास पाटिल, सचिन आटकळे, माऊली जवळेकर, नंदकुमार व्यवहारे, छगन पवार, गोपाळ पाडगे राहूल बिडवे, इतर महिला आघाडी पदाधिकारी तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form