सभासदांना दिलेल्या शब्द पाळला ,ऊसाची संपुर्ण एफ आर पी अदा -- संत दामाजी सह.का.चेअरमन श्री शिवानंद पाटील

दामाजीच्या सभासदांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मागील  गळीतास आलेल्या ऊसाची संपुर्ण एफ आर पी  अदा - चेअरमन श्री शिवानंद पाटील

मंगळवेढा (प्रतिनिधी)-
 श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीतास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांची एफ आर पी ची उर्वरित रक्कम रु ११० ८९ प्र मे टन प्रमाणे एकुण रक्कम रु ४ २७ कोटी संबंधीत शेतकर्यांचे धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा यांचे सर्व शाखातील खात्यावर वर्ग केले आहे  कारखान्याचे गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी दिलेल्या शब्दाप्रमाणे हंगाम सुरु करण्यापुर्वी मागील ऊस बिलाची एफ आर पी पुर्ण  केली आहे  तरी सर्व ऊस उत्पादक सभासद-शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले
विद्यमान संचालक मंडळाने मागील हंगाम २०२१-२२ मधील हंगाम अखेरचे कालावधीतील कार्यक्षेत्रातील सभासद  व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन शेतकर्यांचे संपुर्ण ऊसाचे बिल रु  २१००/- प्र मे टन प्रमाणे एकूण रक्कम रुपये ८कोटी ७५ लाख धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व पतसंस्थेच्या सर्व शाखामध्ये यापुर्वीच वर्ग केले आहे  तसेच मागील गळीत हंगामाचे उर्वरित ऊस तोडणी वाहतुक फायनल बिल रु १,६४,३२,४७०/- यापुर्वी जिजामाता महिला पतसंस्था, मंगळवेढा येथे संबंधीत ठेकेदारांचे खात्यावर जमा करणेत आले आहे  अशा प्रकारे मागील संचालक मंडळाचे काळात गळीतास आलेल्या ऊसाचे बिलापोटी यापुर्वी  रु  २१००/- प्रमाणे राहिलेली बिले अदा केली आहेत  तसेच एफ आर पी पूर्ण करण्यासाठी उर्वरित ऊस बिल रु ४ .२७ कोटी शेतकर्यांच्या धनश्री पतसंस्थेतील बँक खात्यावर वर्ग केले असलेचे व्हाईस चेअरमन श्री तानाजी खरात यांनी सांगीतले
सध्या सर्वत्र मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच कारखान्यांचा हंगाम सुरु करणेस विलंब होत आहे  अशा परिस्थितीत आपले कारखान्याची ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सध्या कारखाना साईटवर आली असुन शेती विभागामार्फत ऊसतोडणी प्रोगाम तयार केला आहे   आजपासुन ऊसतोडणीच्या शेजा देण्यात आल्या आहेत  तसेच कारखाना गळीतासाठी तयार असुन उद्यापासुन पुर्ण क्षमतेने नाॅनस्टाॅप कारखाना चालु करणार आहोत  या हंगामामध्ये ६ ०० लाख मे टन गाळपाचे संचालक मंडळाने उद्ध्द्ष्ट ठेवलेले आहे  मा संचालक मंडळाने ठेवलेले उध्द्ष्ट पुर्ण करण्यासाठी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख,कर्मचारी उत्सुक असलेचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी सांगीतले  .

याप्रसंगी कारखान्याचे संचालक  श्री प्रकाश पाटील,  औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,  ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form