पंढरपूर ------(विनोद पोतदार)
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे बदली विठ्ठल मंदिर देवस्थानकडे झाल्याने त्यांच्या जागी सोलापूर तालुका ग्रामीणचे निरीक्षक अरुण फुगे यांची पंढरपूरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांनी आपला पदभार बुधवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी घेतला आहे .
अरुण फुगे यांनी यापूर्वी सोलापुरातील विजापूर वेस पोलीस चौकी ,तुळजापूर वेस पोलीस चौकी ,तसेच गुन्हे शाखाप्रमुख त्यानंतर सोलापूर तालुका निरीक्षक म्हणून त्यांनी आपली कामगिरी उत्तम रिते बजावली आहे. त्यांचा अनुभव दांडगा आहे पंढरपुरात त्यांची कारकीर्द कशी होती याकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे .ऐन कार्तिक यात्रेच्या तोंडावर पंढरपूरला वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.